• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अज्ञात गाडी जळून खाक, मुंबई-पुणे रस्त्यावर थरार


चौक : अर्जुन कदम 

रात्री नऊ वाजन्याच्या सुमारास जुना मुंबई-पुणे रस्त्यावर विणेगाव हद्दीत चालत्या झायलो गाडीने अचाणक पेट घेतला,यात गाडी जळून खाक झा ली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्त्यावर विणेगाव हद्दीत एका झोयलो गाडीने अचानकपणे पेट घेतला,बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले,सुदैवाने गाडीत असलेल्या तिघांनी गाडीच्या बाहेर येण्यात यश मिळविल्याने जीवितहानी झाली नाही.मात्र गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली,हा दुर्दैवी प्रकार विणेगाव च्या हाकेच्या अंतरावर घडल्याने ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना प्रथमोपचार करून पोलिसांना कळविले,व आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.दिनेश महाडिंक,निलेश बेलोसे,प्रमोद महाडिक,राजा येरूनकर व अन्य लोकांनी मदत केली. झायलो गाडी रोहा इथून चौक हातणोली परिसरात आपली नातेवाईक यांच्याकडे जाण्यासाठी येत होती असे समजते.अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही आलेले नाही.