• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अखेर रसायनी परिसराला कोरोनाचे ग्रहण


आंदोलन : प्रतिनिधी

दोन महिने सुरक्षित असलेल्या रसायनी परिसरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. रसायनी परिसरात एकूण सहा कोरोना विषाणूचे रुग्ण सापडले असून रसायनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रसायनी परिसराला कोरोना विषाणूची लागण ही मुंबई, नवीमुंबई कडे जाऊन येऊन करणाऱ्या कामगारांना झाल्याचे दिसून येत आहे.

रसायनी परिसरात पहिला रुग्ण हा शिवनगरवाडी येथे सापडला असून सदरचा व्यक्ती हा घाटकोपरला कामाला असल्याने कामाच्या ठिकाणी बाधा झाल्याचे समजते. तर दुसरा कोरोना रुग्ण हा दापीवली येथे सापडला असून सदरचा व्यक्ती चेंबूर येथे कामाला असल्याने कामाच्या ठिकाणी बाधा झाल्याचे समजते. शिवनगरवाडी येथे तीन रुग्ण सापडले असून सदर व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोना विषाणूची लागण झाली असून बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याने संसर्ग झाल्याचे समजते. चांभार्ली येथील दुर्गामाता कॉलनीमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण सापडला असून सदर व्यक्तीला दापीवली येथील बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समजते दापीवली येथील संसर्ग झालेली व्यक्ती आणि दुर्गामाता कॉलनी येथील व्यक्ती हे दोघे एकत्र कामाला जात असल्याचे समजते.

सदरच्या मिळालेल्या माहितीवरून असे समजते की रसायनी परिसरात कोरोना विषाणूची लागण ही मुंबई, नवी मुंबई या ठिकाणाहून रसायनीतील कामगारांच्या साहाय्याने आली आहे. तरी सर्व नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सचे पालन करा, कोणत्याही प्रकारचे लक्षण आढळल्यास न घाबरता त्वरित तपासणी करून घ्या. वेळीच तपासणी केल्याने हा आजार बरा होणाऱ्यातला आहे असे आवाहन ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे.