• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अक्षर मानव संघटनेकडून मोफत टेलीफोनिक (telephonic) समुपदेशन हेल्पलाइन


आंदोलन : प्रतिनिधी

लॉकडाऊन मुळे बरीच लोकं अतिशय विचित्र अशा परिस्थितीत जगत आहोत. कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य साथीमुळे लोकांची अपरिमित हानी झाली आहे. आर्थिक आणि वित्तीय अस्थिरतेबरोबरच लोकांना अनाकलनीय अशा भावनिक कोंडीलाही तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांत अस्वस्थता, ताण, निराशा व घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे जनतेला तुटपुंज्या साधनस्रोतांवर अवलंबून राहावे लागत असून, याचा लोकजीवनावर विपरित परिणाम होत आहे. नोकरी, व्यवसाय, उत्पन्नाचे साधनस्रोत गमावण्याच्या भीतीमुळे जनतेच्या मानसिक आणि भावनिक तणावात भरच पडते आहे. 

 परिस्थितीशी जुळवून घेता यावे, याकरिता लोकांची मानसिकता टिकवणे गरजेचे  आहे. 

त्यासाठी मानसिक स्वास्थ्य या विषयाकडे लक्ष देण्याची व त्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता, प्रसिद्ध साहित्यिक राजन खान संचलित अक्षर मानव या संघटनेकडून नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत टेलिफोन द्वारे समुपदेशन केंद्र सुरू केलं आहे. याचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ ९८९००५४५१८, ९९२३८००९३७,  या संपर्क क्रमांकावर फोन करून घ्यावा.  आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल, मन मोकळेपणाने डॉक्टरांशी संवाद साधा, असे आवाहन अक्षर मानवचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत डांगे, राज्य उपाध्यक्ष सुरेश सिरसीकर आणि अक्षर मानव ग्रंथालय विभागप्रमुख व साहित्यिक रोहिदास कवळे यांनी केले आहे.